देशात कोरोना / आतापर्यंत 3 हजार 765 प्रकरणे तर 75 जणांचा मृत्यू; 2 दिवसात 770 पेक्षा अधिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

नवी दिल्ली. देशात वेगाने कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे. शनिवारी देशभरात 563 नवी संक्रमित मिळाले. यातील सर्वाधिक महाराष्ट्रात 145 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तसेच 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी देशात 563 नवीन रुग्ण आढळले होते. देशाता आता संक्रमितांची संख्या 3 हजार 765 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहेत. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, एकूण संक्रमितांची संख्या 3 हजार 72 झाली आहे. यातील 213 बरे झाले आहेत तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आरोग्य मंत्रालय म्हणाले - जमातीमुळे वाढली प्रकरणे


आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, देशात कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तबलिगी जमात. संक्रमणाचे 30% प्रकरणे दिल्लीच्या जमातवरून परतणाऱ्या लोकांमुळे वाढले आहेत. मात्र आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी एका समुदायाविरोधात होणाऱ्या गोष्टींना चुकीचे म्हटले आहे. ते म्हणाले की, निजामुद्दीनमध्ये जे झाले ते दुर्दैवी होते. मात्र यामुळे एकाच समुदायावर टीका करणे योग्य नाही.


Popular posts
यूपीआय, भीम अॅपद्वारे हाेणाऱ्या व्यवहारात मार्चमध्ये 16 हजार काेटींनी घट
गाझियाबादच्या हॉस्पीटलमध्ये जमाती रुग्णांकडून गैरवर्तन, आरोपींवर एनएसए कायदा लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मोदींच्या दिवे लावण्याच्या अपीलनंतर ममता म्हणाल्या - माझ्यासाठी व्हायरसशी लढणे जास्त महत्वाचे, यावरून राजकीय युद्ध सुरु करू नका
कोरोनाशी लढा / पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद, कोरोनाशी लढण्याच्या रणनीतींवर झाली चर्चा